प्रेस मीडिया लाईव्ह :
रायगड जिल्हा प्रमुख : प्रतिनिधी सुनील पाटील
आदिवासी यांच्या दिशाभूल करून रस्त्या सारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या राज्य बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे . उजलोली ते करंबेली ठाकुर वाडी खडई धनगर वाडा रस्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक 29 3 2022 ऐवजी बुधवार दिनांक सहा चार दोन हजार बावीस पासून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी खालापूर यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने बाविस्तीन 2020 रोजी खालापूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे
आदिवासी यांच्या दिशाभूल करून रस्त्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या राजिप बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता व संबंधित कर्मचारी कारवाई करण्यात यावी उजलोली करंबेली ठाकुरवाडी खडई धनगर वाडा रस्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा , आदिवासी यांच्या जाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला असून या आदिवासी वाडीतील जर कोणी आजारी पडले असता त्यांना ने आण करण्यासाठी कुठलीही वाहन जात नसून आजारी माणसाला डॉली मध्ये ने आण करावी लागत आहे , शाळेतील मुलांना सुद्धा चालताना खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच गरोदर महिलाना सुद्धा हॉस्पिटलला जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन त्यांना डोली हा प्रकार ने आण करण्यासाठी लागत आहे.
यासाठी शासनाने झालेले रस्ते मंजूर रस्ते आज पर्यंत झालेले नाहीत , देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली पण अजूनपर्यंत करंबेली ठाकूरवाडी रस्ता स्वतंत्र पणे झालेला नाही नसून त्यासाठी आज त्यांना खालापुर तहसील कार्यालयावर बेमुदत उपोषणाचा इशारा आपल्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिला आहे. संतोष ठाकूर रायगड जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते गोरगरिबांना आदिवासी ठाकुरवाडी इतर समाजासाठी धावणारे असून खरोखर ते संघटनेसाठी लढत असून त्यांना न्याय मिळेल आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या उपोषण सुरू आहे या बाबत शासन त्यांना योग्य तो न्याय देईल अशी आशा वाटत आहे