महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, इंडियन बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस फेडरेशन आणि भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  

   विचुंबे गाव येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशियाई बॅाडीबिल्डींग चे सेक्रेटरी डॅा.संजय मोरे, नगरसेवक हरेश केणी, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे,  विकास घरत, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कामगारनेते रवींद्र नाईक, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी सरपंच गणपत म्हात्रे, प्रमोद भगत, आलूराम केणी, विवेक भोईर,पोलीस पाटील प्रमोद नाईक, आयोजक व विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद भिंगारकर, असोसिएशनचे आयोजक सचिव दिनेश शेळके, रायगड कार्याध्यक्ष मारुती आडकर, ग्रा.पं.सदस्य रवींद्र भोईर, किशोर सुरते, नितीन भोईर, बळीराम पाटील मा.सरपंच विचुंबे, आकाश पाटील सरपंच विचुंबे, अनिल भोईर, जगदीश भोईर, शाम पाटील, सतीश म्हात्रे, नयन भोईर, डी.के.भोईर, अर्जुन सुरते, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, चेतन भिंगारकर, के. सी. पाटील, अविनाश गायकवाड, सुनील पाटील, अनंता गायकवाड, यांच्यासह बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 


कोट- 

गेल्या दोन वर्षात कोविडमुळे सर्व जगाला हादरा बसला. अनेक संकटे जगासमोर उभी राहिली पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक धोरणात्मक पाऊल उचलून देशाला सावरले. मदत करणे हि आपल्या देशाची संस्कृती आहे, त्यामुळे व्यक्ती, संघटना म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात गरीब गरजूंना दिला. कोरोना काळात व्यायामशाळा आणि शरीरसौष्ठव क्षेत्रावर निर्बंध आले आणि व्यायामशाळांवर आलेली बंदी शेवटी उठली. या काळात व्यायामशाळा आणि संबंधित व्यवसायावर मोठे संकट येऊन या क्षेत्राला मोठा फटका बसला. पण तो सहन करत पुन्हा सक्षम होण्याचे काम शरीरोसौष्ठव पटूंनी केले आहे त्यामुळे त्यांच्या जिद्दीला सलाम करतो आणि पुढे उत्तरोत्तर प्रगती करत रहा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. - आमदार प्रशांत ठाकूर 



मेन्स बॅाडी ब्ल्डींग किताब विजेता

अक्षय मोगरकर (मुंबई)


वुमेंन्स बॅाडी बिल्डींग किताब विजेती

हर्षदा पवार (मुंबई)

मेंन्स क्लासिक बॅाडी बिल्डींग किताब विजेता- ऊदय देवरे (रायगड)

मेंन्स फिजिक्स किताब विजेता

गिरीश पाटील (रायगड)

वुमेंन्स बिकीनी किताब विजेती

*श्रद्धा आनंद (मुंबई)*

*टीम चॅम्पियनशिप*

*प्रथम क्रमांक १४० गुण (रायगड)*

*द्वितीय क्रमांक ११८ गुण (मुंबई)*

*तृतीय क्रमांक ८५ गुण (पुणे)*

Post a Comment

Previous Post Next Post