रायगड जिल्हा कर्जत तालुक्यातील नेरळ येथील घटना
प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत तालुक्यात सोनल शिवाजी कोकणे या विद्यार्थ्यांनीचा रेल्वे अपघातात मूत्यू झाला आहे. जामरुख गावातील ही विद्यार्थ्यांनी सध्या तिच्या मामाच्या गावी जिते येथे रहात होती आज काँलेजवरुन घरी जात असताना रेल्वे लाईन ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एक्सप्रेस मेलने तिला उडविले त्या दरम्यान या अपघातानंतर रेल्वे मार्गावरील सिंग्रल यंत्रणा बिघडले होते आणि त्यानंतर तासाने मध्य रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे. कला शाखेच्या पहिल्याच वर्षात शिकत असलेली सोनल कोकणे ही तरुणी कर्जत तालुक्याचा शेवटचा गाव जाम बुद्रुक गाव राहात असल्याने तिची महाविद्यालयांनी शिक्षण घेणे परवडणारे नव्हते त्यामुळे जामरू येथून ती आपल्या मामाकडे आली नेरळ जवळील जिते गावात राहात होती.
कर्जत शहरातील अभिनव प्रशालेच्या उच्च महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी सोनल कर्जत येथून जिते येथे घरी जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी उतरली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे मार्गाने पाडा गेट येथे नेहमीप्रमाणे जाण्याच्या रस्त्याने सोनल चालत निघाली मात्र त्याच वेळी कर्जत येथून मुंबईकडे जाणाऱ्या ७०३२ हैद्राबाद एक्स्प्रेसने तिला धडक दिली. या अपघातात सोनलचा जागीच मूत्यू झाला हा अपघात इतका भयानक होता की तिच्या शरीराचे खुप तुकडे झाले होते नेरळ रेल्वे स्थानक तेथून फक्त १०० मीटर अंतरावर असल्याने अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र समोरील द्दश्य हेलावून टाकणारे होते.
सोनलच्या शरीराचे अवयव अस्ताव्यस्त पडलेले असल्याने पोलिसांनी ते गोळा करून मूतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले.