जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपमध्ये प्रवेश
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी शुक्रवार दिनांक १५ एप्रिलला सायंकाळी ०७ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असून शेकापक्षाला तालुक्यात आणखी एक मोठा हादरा बसणार आहे.
आपटा गावातील मैदानावर हा सोहळा होणार असून पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.