विविध समस्यां बाबत मुख्य व्यवस्थापक श्री.शिंदे साहेबांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्या वतीने निवेदन

 एम्. आय.डी.सी.मोहोपाडा,रसायनी येथील रहिवासी वसाहती मधील विविध समस्यां बाबत मुख्य व्यवस्थापक श्री.शिंदे साहेबांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

मुख्यतः या परिसरातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत, प्रिआ शाळा व जनता विद्यालय यातील हजारो विद्यार्थ्यांना तसेच नागरीकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे तरी ते रस्ते त्वरित करण्यात यावेत.

जे पथदिवे बंद आहेत,ते सुरू करण्यात यावेत.पावसाळा जवळ आला आहे, त्या अनुषंगाने गटारांची साफसफाई करणे.संपूर्ण वसाहती मध्ये कचर्याची समस्या फार गंभीर आहे.त्या वर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.पाताळगंगा नदि वरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यात यावा.शिंदे साहेबां कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.सदर प्रसंगी या.विभाग अध्यक्ष भास्कर डुकरे, मनोज जाधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post