प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : श्री स्वामी समर्थ मंदिरचे अध्यक्ष विरेंद्र किराड यांचे तर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट कोविड योध्दा पुरस्कार वितरणाचा कार्येक्रम घेण्यात आला.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. ना. नानासाहेब पाटोले यांचे हस्ते आणि मा. उल्हास दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मा काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष मा. रमेश दादा बागवे , मा . मोहनदादा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मा . जावेद खान ( शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग अध्यक्ष पुणे ) यांना पुणेरी पगडी , शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मंदिर गणेश पेठ येथे संपन्न झाला. कार्यक्रमास आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे , मान्यवरांचे आभार विरेंद्र किराड यांनी मानले.