किडनी तस्करी प्रकरण : रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पुणे :  येथील रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येई पर्यंत निलंबित करण्यात आला आहे. असे आदेश  सार्वजनिक आरोग्य खात्याने  काढले आहेत.

एका महिलेला 15 लाख रुपयांचे अमिष दाखवून, ती रुग्णाची नातेवाईक असल्याचे दर्शवणारे बनावट कागदपत्रे बनवून तिच्या किडनीची तस्करी केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने रुबी हॉल क्‍लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवून “अवयव प्रत्यारोपणाचा परवाना रद्द का करू नये’ अशी विचारणा केली होती. त्याला 24 तासांत उत्तर देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार रुबी हॉल क्‍लिनिकने त्याला उत्तर दिले. या शिवाय या प्रकरणावर राज्य सरकारने “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील’ सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे.

त्या समितीचे चौकशीचे काम सुरू असून, ससूनमधील अवयव प्रत्यारोपण पडताळणी समितीतील सदस्यांचीही त्यांनी चौकशी केली असून, रुबी हॉल क्‍लिनिकमधील संबंधितांची चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे, हा अहवाल येईपर्यंत त्यांची अवयव प्रत्यारोपणाची मान्यता काढून घेण्यात आली आहे, असे
सांगण्यात आले.

या किडनी तस्करीप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. त्या समितीचा अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत रुबी हॉल क्‍लिनिकची अवयव प्रत्यारोपणाची मान्यता आम्ही निलंबित केली आहे. – डॉ. साधना तायडे, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

Post a Comment

Previous Post Next Post