- डॉ रवींद्र शिसवे (IPS), पोलीस सह आयुक्त, पुणे.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ते यशवंत अधिकारी...ध्येयपूर्ती सोहळा, मोठ्या दिमाखात संपन्न‼️
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : MPSC मार्फत (PSI )उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार पुण्याचे पोलीस सह आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांच्या हस्ते केसरी वाडा येथे झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती, गिरीश खेडकर ( संचालक इन्फिनिटी अकॅडमी) , लक्ष्मीदास सोनकवडे, अमित डहाणे, स्वप्नील भोर (संचालक इन्फिनिटी अकॅडमी) परशुराम शिंदे, आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक वृंद, विद्यार्थी, इन्फिनिटी परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ शिसवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांच्या एकंदरीत पोलीस खात्यातील सेवेच्या अनुभव भावी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडला. एक वर्दीतील संवेदनशील कवी देखील यावेळी सर्वांना पाहायला मिळाला. आपल्या उस्फुर्त आणि तितक्याच मार्मिक शब्दांनी शिसवे साहेबांनी विद्यार्थ्यांचे आणि उपस्थित स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मान्यवरांचे मन जिंकले. यावेळी त्यांनी द इन्फिनिटी अकॅडमी मार्फत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली आणि सदैव साथ देण्याबद्दल आश्वस्त केले. भावी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यातील नैतिकता, प्रामाणिकता आणि जनसामान्यांशी नाळ कशी जपावी याचा वस्तुपाठच उभा केला.
डॉ शिसवे यांच्या मार्गदर्शन पण संबोधनाला विद्यार्थी वर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
यावेळेस उपस्थित गिरीष खेडकर यांनी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व मान्यवरांचे आभार मानले.
अधिक माहिती साठी संपर्क
9049450350