त्यांच्या या आंदोलनाची मोठी चर्चा त्या वेळी झाली होती.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )
आदर्श नगरसेवक म्हणुन ओळखले जाणारे व त्यांच्या प्रभागात त्यांना देव म्हणून मानणारे मतदार राजा या सर्वांसाठी वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडल्यानंतर दोनच दिवसात त्यांना शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आलं. वसंत मोरें चे सभागृहातील सहकारी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष करण्यात आलं. पुणे मनसेतील धुसफूस अनेकदा मोरे यांनी बोलून दाखवली आहे. पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर आक्षेप घेत वेळोवेळी आपली नाराजी त्यांनी राज ठाकरेंकडे सुद्धा व्यक्त केली होती.
गुरुवारी मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मोरे यांना बोलावण्यात आलं नाही, त्याचबरोबर कुठलिही पूर्वसूचना न देता त्यांना अचानकपणे शहराध्यक्ष पदावरुन देखील काढून टाकण्यात आलं. त्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना मी महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्षामध्ये आहे आणि राहणार असं ते म्हणाले होते.
'शहराध्यक्ष पदावरुन का काढून टाकण्यात आलं..? हे मी इतर पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेईन परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या भागामध्ये मला शांतता हवी हीच माझी भूमिका असणार आहे. ज्या भागामध्ये मी निवडून येतो तो मुस्लिम बहूल भाग आहे त्या लोकांशी माझे जवळचे संबंध आहे. त्या लोकांचे मला फोन आले काही लोक मला भेटायला आले. त्यांनी त्यांची चिंता बोलून दाखवली आणि त्यातून मी असे स्पीकर लावणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे मी भावनिक होऊन व्यक्त झालोवसंत मोरे यांच्या भूमिकेचं अनेक राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, भाजप या पक्षांकडून त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण सुद्धा आलं. मोरे यांना पदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
वसंत मोरे (तात्या ) ..पांढरा शुभ्र सदरा, कपाळावर टिळा असा पेहराव असणाऱ्या वसंत मोरे यांना त्यांचे समर्थक 'तात्या' म्हणून हाक मारतात. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेपासून वसंत मोरे पक्षाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या गाडीवर त्यांनी 'राजसमर्थक' असं लिहीलं होतं. राज ठाकरेंच्या जवळचे आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून वसंत मोरे ओळखले जातात.
मनसेकडून लढवण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत वसंत मोरे कात्रजमधून निवडून आले. त्यानंतर सलग तीन निवडणुका ते जिंकत आले आहेत. 2017 च्या भाजपाच्या लाटेत देखील वसंत मोरे हे निवडून आले होते. वसंत मोरे यांना शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी काहीतरी करायला हवं या भावनेतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.त.त?निवडून आल्यानंतर 2007 ते 2009 या काळात ते स्थायी समितीचे सदस्य होते, 2009 ते 2010 या काळात शहर सुधारणा समितीत देखील त्यांनी काम केले. 2012 ते 2014 मध्ये ते पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते होते. 2021 मध्ये राज ठाकरे यांनी त्यांची पुणे शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती.
वसंत मोरे यांच्यावर विविध 11 गुन्हे दाखल आहेत. कोव्हिड काळात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडण्याचे प्रकार असोत की अपंग व्यक्तीची गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमर हातोड्याने तोडणं असो. मोरे यांच्या आक्रमक शैलीमुळे अनेक तरुणांचं देखील त्यांना समर्थन मिळत गेलं.मोरे यांनी जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती कोरोना मध्ये निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. मोरे यांनी रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगारातून रुग्णवाहिका मागवली होती. वारंवार फोन करुन देखील रुग्णवाहिका येण्यासाठी साडेतीन तास लागले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी महापालिकेच्या वाहन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांची शासकीय गाडी फोडली होती.रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी गाडीत कसे फिरता ?' असं म्हणत लाकडी दांडक्याने त्यांनी महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. नगरसेवकांच्या नातेवाईकांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पुण्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यात पुणे महानगरपालिकेने कोरोनामुळे जे रुग्ण घरी मृत्यूमुखी पडतील त्यांचा अंत्यविधी त्याच्या घरच्यांनीच करावा असा निर्णय जाहीर केला होता. महापालिका नातेवाईकांना पीपीई किट देत होती. या पालिकेच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा मोरे यांनी काढली होती. त्यावेळी वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी पीपीई किट घालून थेट महानगरपालिकेच्या आवारात दाखल झाले होते. त्यांच्या या आंदोलनाची मोठी चर्चा त्या वेळी झाली होती.