सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना या बाबतच्या अर्ज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे.. डॉ. पी ए इनामदार..

 आजम कॅम्पस  येथे मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची मार्गदर्शक बैठक संपन्न..


प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : 

पुणे दि.21 शहरातील अवामी महाज या संघटनेच्या वतीने आझम कॅम्पस या ठिकाणी  अजान व त्या साठी लाऊड स्पीकर कायद्या अंतर्गत वापर  मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती . या  बैठकीत विविध मुस्लिम समाजातील संघटनांनी भाग घेतला होता . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी .ए. इनामदार  होते.

धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादे बाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना या बाबतच्या अर्ज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन डॉ. पी ए इनामदार यांनी केले.

डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले की , ' पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक परवानगी संबंधी  अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी  परवानगी आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्माच्या धर्म स्थळांना देखील  ध्वनीक्षेपक  परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणूका असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले तरी शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे.तीच सर्वांची भूमिका असली पाहिजे. पुणे शहर, महाराष्ट्र राज्य शांतताप्रिय आहे आणि या पुढे ही राहील.

यावेळी प्रमुख आयोजक डॉ पी. ए.इनामदार, सैफ मोहम्मद सय्यद, मोहम्मद गौस शेर ऐहमद सय्यद, मशकुर ऐहमद शेख,उमर शरीफ शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाचे अॅड. अयूब शेख,नुरुद्दीन सोमजी,  अॅड. शेरकर, अवामी महाझ सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी व इक्बाल शेख,मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण,अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी,असलम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.

देशात व महाराष्ट्र राज्यात कायद्याचे  व संविधानाचे राज्य आहे,जर कुणीही मशिदी वरील भोंगे काडा असे वत्व्य करत असेल तर ते कितपत योग्य आहे असा ही प्रश्न निर्माण झाला आहे ?.3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदीं समोर  हनुमान चालिसा लावू," असा इशारा  ठाण्याचे सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता, त्या नंतर राजकारण करण्यावर  आणि जनतेला जीव घेणारी महागाई, वाढती बेरोजगारी,भ्रष्टाचार,गुन्हेगारी, जणू या महत्वाच्या विषयावर बोलणे आणि विचार करण्याची गरज राहिलेली नाही असे स्पष्ट चित्र राज्यात निर्माण झालेले दिसत आहे ,


दिवसातून पाच वेळा अजान म्हटली जाते. एका वेळेस आजान द्यायला जास्तीत जास्त तीन मिनिट लागतात दिवसा पाच वेळा नमाजच्या वेळेची आठवण करून दिली जाते. नमाजची वेळ ठरलेली नसते. सूर्याच्या दिशेनुसार आणि स्थानानुसार दररोज वेळ बदलते.

ध्वनी प्रदूषणाचे नियम काय सांगतात ..?

भारतात लाऊडस्पीकरच्या वापराविषयीचे नियम 2000 साली लागू झाले. The Noise pollution (regulation and control) rules अर्थात ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण या नावानं ते ओळखले जातात. हेच नियम मशीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही लागू होतात.या नियमांनुसार एखाद्या ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टिम लिखित परवानगीशिवाय लावता येत नाही.बंदिस्त सभागृह, कॉन्फरन्स रुम किंवा आपत्कालीन परिस्थितीचा अपवाद वगळता रात्रीच्या वेळेस (रात्री 10 ते सकाळी 6) लाऊडस्पीकर लावता येत नाही.काही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा सणांच्या वेळेस राज्य सरकार रात्री 10 ते 12 वेळात लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देऊ शकतं, पण ते दिवस आधीच जाहीर करावे लागतात.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा त्या ठिकाणच्या नेहमीच्या आवाजापेक्षा जास्तीतजास्त 10 डेसिबल वर तसंच 75 डेसिबलपेक्षा जास्त असू शकत नाही. खासगी जागेसाठी ही मर्यादा 5 डेसिबलची आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाची मर्यादा अशी आहे:

* औद्योगिक परिसरात दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल

* व्यावसायिक परिसरात दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल

* रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल

* सायलेंस झोनमध्ये दिवसा 50 तर रात्री 40 डेसिबल 

मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण का होत आहे..?

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा या मुद्यावर राजकारण होत आहे. यापूर्वीही अनेकदा उत्सव सणांच्या कार्यक्रमांत कारवाई झाल्यास  राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

मशिदींवरील भोंगे चालतात मग हिंदूंच्या सणांमध्ये आवाज का चालत नाही..? असाही प्रश्न उपस्थित केला जातो.एक मेकाकडे बोट दाखवायची आणि जनतेला मूळ मद्यांवरून विचलित करायची ही जुनीच खेळी आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह . पुणे

सह संपादक अन्वरअली शेख 



Post a Comment

Previous Post Next Post