प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : धर्माच्या नावावर भावना भडकाविण्याचे प्रयत्न होत असताना शांतता, बंधू भाव जोपासण्याचे आवाहन करण्यासाठी पुण्यात कोंढवा ते डॉ.आंबेडकर पुतळा,गांधी पुतळा ( पुणे स्टेशन ) मार्गावर इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने शांती पदयात्रा काढण्यात आली. त्यात सर्वधर्मीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी संयोजन केले.माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
रविवार, २४ एप्रिल रोजी नरवीर तानाजी मालुसरे चौक ( कोंढवा ) येथून सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. धर्मनिरपेक्ष मूल्य मानणाऱ्या संस्था, संघटना सहभागी झाल्या. सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी शांतीचे प्रतिक म्हणून सफेत पोशाख परिधान केले होते. म. गांधीजींची छायाचित्रे घेऊन, पोशाखावर तिरंगी झेंड्याचे बॅजेस लावलेली होती. सर्वधर्मीय प्रार्थना म्हणण्यात आली.
अस्वस्थतेच्या काळातील ही पहिली शांतीयात्रा म्हूणून ही पुण्यातील पदयात्रा महत्वपूर्ण असून महात्मा गांधींचे सद्भावनेचे विचार पोहोचविण्यात मदत करीत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
' पुण्यातील शांतता, सलोख्याचे वातावरण टिकून राहावे ,यासाठी शांती पदयात्रेचे आयोजन केल्याचे ' असलम बागवान यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी वसंतराव साळवे,अॅड. संतोष म्हस्के, विलास किरोते, तमन्ना इनामदार, इब्राहिम खान, अंजुम इनामदार, सौ. विभा देशपांडे, राजू सय्यद, बशीर सय्यद,इक्बाल मुलाणी,छबील पटेल, निखिल जाधव, प्रकाश कदम, सचिन रुद्रा, शब्बीर पटेल, समीर शेख, अब्दुल बागवान, सादिक पानसरे, सलीम शेख, साहिल मणियार, मोबीन शेख, विजय जगताप, एजाज शेख आदी सहभागी झाले.