प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख : (सह संपादक )
पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 61 वाहनांचा जाहीर लिलाव ई-लिलाव पद्धतीने 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर पार्किंग, पुणे येथील आवारात वाहने पाहणीसाठी उपलब्ध आहेत. टूरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा, खाजगी वाहन या वाहनांचा यामध्ये समावेश आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहिल. ई लिलावात सहभागी होण्यासाठी 11 ते 12 एप्रिल सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्र व ‘आर.टी.ओ., पुणे’ या नावाने हलक्या वाहनास 25 हजार रूपये व अवजड वाहनास 50 हजार रूपये रक्कमेच्या अनामत धनाकर्षासह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी.
जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, 39, डॉ. आंबेडकर रोड, संगम पूल, पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणतेही कारण न देता हा जाहीर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकाऱ्यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.