सुसंस्कृत राष्ट्रासाठी मुल्य शिक्षणाची गरज : आशा राऊत उपायुक्त पुणे महानगरपालिका

 

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : 

पुणे दि.१, आज मानवीय जीवनात शिक्षणाची आवश्यकता आणि शिक्षणातून मानवतेची निर्मिती या विषयाला जागतिक पातळीवर मंथन करण्याची आणि जागतिक पातळीवर प्रत्यक्ष माणसा माणसा मधे रुजवण्याची काळाची गरज आहे .


मानवी जीवनामध्ये व्यक्तीमत्व व जीवन मुल्य विकसित करण्यासाठी मुल्य शिक्षणाचा खुप मोठा वाटा आहे . निसर्गापुढे माणूस अतिशय  शुष्म आहे, हे कोरोना सारख्या जागतिक आपत्तीत दिसून आले . निसर्ग , हवा , पाणी , प्रकाश देताना कुठलाही प्रांत , जात , धर्म आणि भाषिक भेदभाव करत नाही . परंतू माणुस जात , धर्म , प्रांत आणि भाषिक भेदभाव करतो . आपण आपल्या राष्ट्रपुरुषांमध्ये आणि भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना जाती धर्माच्या साखळदंडात जोखडून ठेवले आहे . - 

● एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात द्रोणाचार्य व एकलव्य यांचा आजही गुरु शिष्याचा परस्पर संबंध आहे . भेदाभेद अमंगळ याची जाणीव करुन देण्यासाठी आणि जाती धर्म आणि पंथ यांच्या भिंती पाडून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी अशा मुल्य शिक्षण कार्यशाळेची नितांत गरज आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री . मितेश घट्टे यांनी केले . ते एआयएसएसएमएसचे अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , राष्ट्रीय सेवा योजना , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय मुल्य शिक्षण - व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . या प्रसंगी मा . आशा राऊत , उप आयुक्त , पुणे महानगरपालिका , संस्थेचे सहसचिव , श्री . सुरेश शिंदे , प्राचार्य डॉ . डी . एस . बोरमणे , डॉ . नाना शेजवळ , रासेयो कार्यक्रम अधिकारी विभाग प्रमुख प्रा . व्ही . आर पाटील , डॉ . परमानंद डांगे आदी मान्यवर उपस्थित होते . आजच्या युवकामध्ये भावनिक , बौद्धिक , शारीरिक , मानसिक , वैज्ञानिक व सुसंस्कृत विकास घडवून आणण्यासाठी मूल्य शिक्षणाचा खुप मोठा वाटा आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांत जिज्ञासा , संशोधक बुद्धी , मनाची व हृदयाची शुद्धता , मनाचा कणखरपणा , सर्व समावेशकता समाजाबद्दल आपुलकी निर्माण व्हायला मदत होते असे पुणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त मा . आशा राऊत यांनी सांगितले . त्या पुढे म्हणाल्या की , सशक्त आणि सुसंस्कृत मूल्य संवर्धित राष्ट्रासाठी अशा मूल्य शिक्षण कार्यशाळा सर्व शैक्षणिक संस्थामधून घेण्याची नितांत गरज आहे . कार्यशाळेच्या प्रास्ताविकात डॉ . नाना शेजवळ , कार्यक्रम अधिकारी यांनी मूल्यांच्या अभावामुळे अनेकजण एकाकी , निरुत्साही , नैराश्यग्रस्त व हिंसाचारी बनत आहेत . त्यामुळे व्यापक मानवतेचा संदेश देणारे , चांगला माणूस घडविण्यावर भर देणारे , मूल्यशिक्षणाचा विचार करायला हवा असे सांगीतले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . डी . एस . बोरमने यांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार या विविध उपक्रमांची माहिती दिली . संस्थेचे सह सचिव श्री . सुरेश शिंदे यांनी छ . शाहू महाराजांच्या सामाजिक विचारांच्या मुल्याची जाणीव सर्वाना करून दिली . या मूल्यशिक्षण कार्यशाळेसाठी पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते . कार्यक्रमाचे सुत्र संचलन कु . सायली कोळी हीने केले व रासेयो विद्यार्थी समन्वयक समृधी , अक्षय , कृष्णा , श्रध्दा , शाहिस्ता , श्रुती यानी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरित्या केले . कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार मानून , राष्ट्रगीताने करण्यात आली . 



प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post