प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : येथील गणेश पेठ हमजेखान चौक येथे मुस्लिम समाज तर्फे रोजा इफ्तारचा कार्येक्रम सोबत हनुमान चालीसा प्रसाद सुद्धा रोजदारणा वाटप करण्यात आला. मा. बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री काँग्रेस पार्टी. महा) व रवी आण्णा माळवदकर ( माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे) यांनी रोजदार मुलांना खजूर व प्रसाद देऊन इफ्तारी केली.
या वेळी मा. बाळासाहेब शिवरकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पुण्यनगरी ही धर्मनिरेक्षतेचा गड आहे , तर रवींद्र माळवदकर म्हणाले की , हिंदूंची व संतांची नगरी म्हणजे पुण्यनगरी . आप पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार म्हणाले की राजकारण करत असताना काही नेत्यांना काळत नाही आपण काय करतोय त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता बळावते.
या वेळी अध्यक्ष मुस्ताक पटेल (कार्यकारी अध्यक्ष ) मुस्लिम अवकाफ वेल्फेअर ट्रस्ट , इकबाल दरबार , मुख्तार शेख ( माजी नगरसेवक) , युसुफ शेख , मुख्तार पटेल , इक्बाल अन्सारी , महादेव शिंदे , आमिन शेख उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन अखिल राष्ट्रीय समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हाजी इकबाल तांबोळी , सलीम खान यांनी केले. शेवटी मुस्ताक पटेल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे आभार मानले