प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख : ( उपसंपादक )
पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. शिवाय वसंत मोरे पक्ष बदलल्यास मी त्यांच्या सोबत राहणार असल्याचे. अझरुद्दीन सय्यद म्हणाले . मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसे समोर आणखी एक महासंकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आले आहे.
वसंत मोरे येत्या सोमवारी राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार..
पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटविण्यात आले. मात्र त्यांना अखेर राज ठाकरे यांनी बोलविले आहे.
वसंत मोरे यांनी गुरूवारी रात्री यांनी राज ठाकरे यांना मेसेजही पाठविला होता. मात्र राज ठाकरे यांनी मेसेजचा रिप्लाय सुद्धा दिला नव्हता. मात्र काही वेळातच मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले. राज ठाकरे यांनी सोमवारी बोलाविल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुऴे सोमवारी या बैठकीत काय होणार याची उत्सुकता आहे.
वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात गोंधऴ होता.त्यामुऴे .राज ठाकरे यांनी गुरूवारी पुण्यातील पदाधिकारी यांची बैठक बोलविली होती.या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावले होते.