पुणे क्राईम : सावकारीचा जाच आता कर्जदारांसोबतच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेलाही होऊ लागल्याचे दिसत आहे



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : शहरातील सावकारीचे कंबरडे मोडण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ध्येय स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसत असून, त्याचा जाच आता कर्जदारांसोबतच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेलाही होऊ लागल्याचे दिसत आहे. सावकारीत गुन्हे शाखेने आरोपी ताब्यात घेऊन त्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे पाठविल्यानंतर तक्रारदार, आरोपी व गुन्हे शाखेच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.

शहरातील अवैध सावकारीच्या जाचात पुणेकर अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याबाबत तसेच सावकरांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेने कंबर कसली असून, सावकारांविरोधात तक्रार देण्यासाठी खास एक हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. पण, त्याला पोलीसांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. स्थानिक पोलीस तर याप्रकरणात तक्रारदाराचे ऐकूनही घेत नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शनिवारी एक प्रकरण समोर आले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने ८५ हजारांचे व्याज देऊन त्याबदल्यात साडे तीन लाख रुपये उकळणाऱ्या सावकाराला चौकशीला बोलविले होते. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने १० टक्क्याने व्याजाने पैसेही घेतल्याचे मान्य केले. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. संबंधित पोलीस निरीक्षक तसेच परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या नावाने पत्रव्यवहार केला.तसेच, चौकशी केल्यानंतर मिळालेले पुरावे तसेच तक्रार आणि इतर माहितीही देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तक्रारदार व सावकार यांना ठाण्यात पाठविले. पण, संबंधित निरीक्षकांनी तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली. त्यांनी वरिष्ठांना विचारावे लागेल, असे म्हणत त्यांना फोनवरून माहिती दिली. वरिष्ठांनी दोन दिवसांनी पाहतो, असे म्हणाले. त्यामुळे हे कर्मचारी सावकार व तक्रारदार यांना घेऊन परिमंडळाच्या कार्यालयात गेले. त्यानंतर तेथे पत्र देऊन त्यांचा सही शिक्का घेतला.

थकाने त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अडचण सांगितली. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला व तक्रारीबाबत विचारणा केली. या विचारणीचा 'राग' त्या वरिष्ठांना आला. त्यातून हे घोंगड चार ते पाच तास भिजत पडलं होत. शेवटी गुन्हे शाखेच्या वरिष्ठांना ही बाब कानावर घालण्यात आली. त्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांना ही तुमची जबाबदारी आहे, असे सांगत गुन्हा दाखल करून घेण्याबाबत सांगतो, असा निरोप त्यांना दिला.सायंकाळपर्यंत हे घोंगड असच भिजत पडलेले होते अन् तक्रारदार व तो सावकार व गुन्हे शाखेचे पोलीस ठाण्यात आदेशाची वाट पाहण्यात बसून होते. त्यामुळे एकीकडे पोलीस आयुक्तांनी जरी सावकारकी मोडून काढण्यास कंबर कसली असली तरी स्थानिक पोलीस त्याला तितकं गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post