नळाने किंवा टँकर ने पाणी न दिल्यास धरणे आंदोलन करणार.. विजय कुंभार (राज्य संघटक )

         पुण्यात पाणी पेटल....


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आम आदमी पार्टी तर्फे  बालगंधर्व येथे पाण्यासाठी जोरदार जल आंदोलन करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या कामात सुद्धा राजकारण  करून जनतेस वेठीस धरणाऱ्या  महानगरपालिकेचा कामाचे वाभाडे काढले.  महानगरपालिकेने  मुबलक पाणीपुरवठा करावा , किंवा टँकर ने पाणी पुरवठा करावा शिवाय टँकरचे बिल देखील महानगरपालिकेने द्यावा अशी जोरदार मागणी  आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. 




 या आंदोलनामध्ये  आम् आदमीचे. राज्य संघटक विजय कुंभार राज्य संघटक पुणे शहर यांनी  जो पर्यन्त पाणीपुरवठा नियमित होत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे सांगीतले . . या आंदोलना मध्ये  विजय कुंभार , डॉ.अभिजीत मोरे , सुदर्शन जगदाळे , आबासाहेब कांबळे , अन्वर बाबा शेख , प्रभाकर कोंढाळकर , श्रीकांत आचार्य , मंजुषा नयन , ज्योती ताकवले , आरती करंजावने वैशाली डोंगरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post