"पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको. पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या" : आम आदमी पक्षाची मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वाढत्या उष्म्या सोबतच पुण्यात पाणी प्रश्न ही पेटू लागला आहे. पाणी पुरवठा केंद्रात मुबलक पाणी साठा असून ही नागरिकांना मात्र पाणी विकत घ्यावे लागत आहे. या बाबत सर्व स्तरांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. आम आदमी पक्षाने नुकतेच पुण्यात आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. *'टँकर मुक्त पुणे' करण्याचा ध्यास 'आप' ने घेतला आहे. या त्यांच्या भूमिकेला मनोबल मिळाले आहे ते "टँकर माफिया मुक्त दिल्ली" या यशस्वी प्रयोगाने. दिल्लीतील नागरिकांना हक्काचे वीस हजार लिटर पाणी मिळते; पुण्यात मात्र पाणी कर भरून ही नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. 800 ते 1200 रुपये प्रति टॅन्कर दराने पैसे मोजावे लागत आहेत तर अनेक रहिवासी सोसायट्या या टँकर माफियांच्या विळख्यात सापडल्या आहेत. हे टँकर माफियाचे जाळे स्थानिक राजकिय नेत्यांच्या वरदहस्ताने चालते हे सर्व जण जाणतात. त्यामुळेच पुणे शहरात पाण्याचा मुबलक साठा असून ही नळाला मात्र पाणी येत नाही अशी खंत महिला व गृहिणी व्यक्त करीत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न गांभीर आहे.* त्या भागात अजून ही पाणी पोहोचलेले नाही.
प्रस्थापित पक्षांनी सत्तेत असताना या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकांचे वेध लागताच पाण्यासाठी आंदोलन वगैरे करण्याचा देखावा ते करीत आहेत. या खेरीज काही लोक सत्तेत होते तेव्हा मूग गिळून बसले होते व सत्तेतून पायउतार होताच 'लोकांच्या पाणी प्रश्नासाठी'म्हणुन न्यायालयात धाव घेण्याचा दुटप्पीपणा करीत आहेत. अश्या दुटप्पी वृत्तीने समस्या सुटत नाही तर त्या आणखी गुंतागुंतीच्या होतात, अशी टीका पाणी प्रश्नावर अभ्यास असणारी मंडळी करतात.
आणखी भरीत भर म्हणुन की काय टँकर मुळे घडणाऱ्या अपघातांच्या प्रकरणात ही वाढ झाली आहे. या *टँकर माफियांची दहशत* इतकी आहे की त्यांच्या passing नसलेल्या निकृष्ट दर्जाच्या वाहनाना RTO व पोलीस प्रशासन कुणीही अटकाव करीत नाही. हे टँकर्स बिनबोभाट पणे रस्त्यावरून धावतात. त्यांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरी ही महानगरपालिका प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. *'टँकर मुक्त पुणे' हा नारा घेवून आम आदमी पक्ष रिंगणात उतरला आहे. आम आदमी पक्षाने पाणी प्रश्न ऐरणीवर घेतला आहे. ज्या भागांमध्ये नळ जोडणीद्वारा पाणी पुरवठा पोहोचला नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेणे स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसवू नये अशी मागणी 'आप' ने केली आहे.
ज्या रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा केला जात नाही त्यांच्या कडून पाणीपट्टी घेण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही. पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून *टँकर लॉबीचे उखळ पांढरे करून दिले जात आहे व त्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरून त्यांना मूलभूत हक्क पासून वंचित ठेवले जात आहे* असा आरोप आम आदमी पक्ष करीत आहे.
त्यामुळे त्या विरोधात *आम आदमी पक्षाचे राज्य संघटक श्री. विजयजी कुंभार यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात तीव्र स्वरूपाचे जल हक्क आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा संकेत आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, जल हक्क समितीचे सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे यांनी दिला आहे.