दुषित नदीचे काठ सुधारणा करून करणार काय? छावा स्वराज्य सेनेचा सवाल
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत पुणे मनपासह ३८१ संबंधितांवर करणार याचीका दाखल.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पुणे, २७ एप्रिल: मुळा- मुठा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कॅन्सर चा धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्याचे पृत्थकरण (Analysis Report) माहाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केले असता यातील विविध रासायनिक घटक विषाणूप्रचंड मोठ्या प्रमाणात आढळले. हे रोगजन्य विषाणू प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष स्वरूपात आपल्या शरीरात जात असल्याने कॅन्सर सारखे रोगांना आमंत्रण दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी ची तपासणी केली असता या पाण्यापासुन कॅन्सर चा धोका आढळून आला या संधर्भातील निष्कर्ष देखील आरीफ शेख यांनी सर्वप्रथम जाहीर केले होते. तसेच मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्याचे तपासणी चे रिपोर्ट आल्यावर संबंधित पुणे महानगरपालिका व महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत जे नदी दूषित करीत आहे या सर्वांवर तसेच पुणे मनपा आयुक्त, आधिकारी, मंत्री यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार; असा इशारा देखील छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी आज दिला.
मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्यामुळे पुणेकरांना व महाराष्ट्रातील तमम जनतेला कॅन्सर तसेच इतर असंख्य महारोगाचा धोका टाळण्यासाठी मुळा-मुठा नदीतील पाणी संकलन करून तपासणीसाठी मा. उपसंचालक आरोग्य सेवा व राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा येथ आज़ नेण्यात आले. छावा स्वराज्य सेना संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी केलेल्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत ३ वर्षाच्या अभ्यासपूर्ण रिपोर्टनुसार ही प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी श्री. राम पाटील (छावा स्वराज्य सेना, संस्थापक /अध्यक्ष), श्री आरिफ भाई शेख ( प्रदेश कार्याध्यक्ष), सौ.शीतलताई हुलावळे (प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी), सोनाज नेटके (पुणे उपाध्यक्ष, छावा स्वराज्य सेना), निर्मला रायरीकर, सुषमा यादव, चित्रा जानुगडे (कायदेशीर सल्लागार), धनश्री बोनाडे, सतीश कांबळे, सर्व पदाधिकारी व कायदेशीर सल्लागार मंडळ उपस्थित होते.
पर्यावरणाच्या व मूळा मुठा नदी काठ सुधार योजनेच्या नावाखाली पुणे मनपा व निव्रुत्त सत्ताधारी पक्षानि संगनमत करून घोषणांची खैरात पुणेकरांना देत आहेत. जन माणसांच्या जीवाशी खेळून पुणेकरांचे आरोग्य धोक्यात टाकायला जवाबदार म्हणून मनपाचे आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस आयुक्तांना १६ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार अर्ज आरिफ भाई शेख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात केला होता किंतु अद्यापही त्याची दखल घेतली नाही; तर अजून किती जनांचा बळी पडण्याची वाट पाहत आहेत? असा प्रश्न देखील आरिफ शेख यांनी उपस्थित केला.
शेख पुढे म्हणाले, मागील 7 वर्षापूर्वीच जयका प्रकल्पाची सुरुवात व्हायला हवी होती ती आजपर्यंत झाली नाही; आणि पुढील किती वर्षे अजून होणार नाही. वर्षानुवर्ष सामन्या नागरिकांना दुषित पाण्याचे दुष्परिणाम सोसावे लागणार का? आणि कॅन्सर सारख्या रोगाला बळी पडून जीव गमवत राहायचे का? यांचे उत्तर पुणे मनपाने द्यावे.व त्यानंतर घोषणांची आतिषबाजी करावी असे शेख यांनी आयुक्तांना विचारले इत्केच नाहि तर पुणे मनपा ने कदिहि न होणाऱ्या प्रकल्पांच्या घोषणे बजित भारताचे पंतप्रधान मा श्री मोदी साहेबांना पण भूमिपूजन करून त्यांनाही सामील करून घेतले असा आरोप शेख यांनी केला.
प्रदूषणाच्या प्रकारात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व जल प्रदूषण असता साध्या महाराष्ट्रात भोंग्यांचे प्रदूषणाच्या नावाखाली षडयंत्र चालू आहे ते ध्वनी प्रदूषणाबाबत आहे; तेव्हा महाराष्ट्रातील तमाम जनेच्या वतीने सन्मनिय राज साहेबांना विनंती करतो की ध्वनी प्रदूषणा मुळे किंवा भोंग्यांच्या प्रदूषणामुळे नक्कीच सामान्य माणसाला कॅन्सर सारखा रोग होत नाहि किंवा मलेरिया, डेंगू, फ्लू, आणि कोविड 19 सारख्या महामारीचा प्रसार होत नाही. किंतु जल प्रदुषण व वायू प्रदूषणामुळे परिणाम नक्की होतो. तेव्हा आमची विनंती आहे की आपण या प्रदूषणाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे महाराष्ट्रातील सर्व जनता आपली फार फार आभरि राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न महाराष्ट्राला सुजलाम सुफ़लम व हरित राज्य करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे शेख यांनी त्यांचे प्रदूषणा बाबतीत स्वविचर मांडले.
प्रेस मीडिया लाईव्ह
सह संपादक अन्वरअली शेख