पुण्यात मनसेला अजून एक धक्का...

 मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांचा राजीनामा...


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पुण्यात मनसेला अजून एक धक्का बसला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला असून शहरात मनसे गारद झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी झाली.त्यानंतर पक्षांतर्गत वातावरण  चांगलेच तापत चाललेले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश दिलेले असताना त्यास विरोध करणे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना भोवलं, परिणाम पदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी माजी नगरसेवक व गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातील खदखद वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या वेळी मशिदींवरील भोंग्यांचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. याआधी देखील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या त्या विधानानंतर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसतं आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post