प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे हॉटेलियर्स असोसिएशन ने एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकार्याने आयोजित केलेल्या क्रिकेट टूर्नामेंट चे उद्घाटन आझम कॅम्पस क्रिकेट मैदानावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी.ए.इनामदार हे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे .हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि हॉटेल इंडस्ट्रीमधील २४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.४ एप्रिल रोजी उद्घाटन सोहळा पार पडून स्पर्धेला उत्साहात सुरवात झाली.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख, पुणे हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष शरण शेट्टी, उपाध्यक्ष अमित शर्मा, प्राचार्य अनिता फ्रांझ,सुजू कृष्णन, सुमित कुमार, सुमित शर्मा, विनय नायर, अनुराग राहा, बिस्वजीत बिस्वास, नासीर शेख, संजय सिंग, अरुण नय्यर, श्रीनिवास चाफळकर, सीआर विनोज, वैभव लांबा उपस्थित होते. ७ एप्रिल रोजी पारितोषिक वितरण समारंभ आहे.