प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ.तुषार निकाळजे या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे 'भारतीय निवडणूक प्रणाली' हे संशोधनात्मक पुस्तक चार वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तकं म्हणून मान्यता मिळाली आहे .याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे .यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये डॉ.तुषार निकाळजे यांच्या या पुस्तकाचे तीन विद्यापीठांना अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने याची नोंद घेतली होती. डॉ.तुषार निकाळजे हे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत होते .ते दि. ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. याच चार विद्यापीठांबरोबर इतर पाच स्वायत्त महाविद्यालयांनी डॉ. तुषार निकाळजे यांचे वरील पुस्तक अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता दिली आहे.संपूर्ण भारतामधील विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्याने शैक्षणिक (Academic)काम केल्याबद्दलचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधील ही पहिलीच नोंद आहे. शिक्षण किंवा संशोधन याला वयाची अट नसते, याचे डॉ. निकाळजे हे एक उदाहरण आहे.
याप्रसंगी डॉ. तुषार निकाळजे म्हणाले, "सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत मी कार्यालयीन कामकाजा बरोबरच शैक्षणिक काम केले .त्याचे हे फलित आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशी हे कार्य करताना एखाद्या क्रिकेटच्या सामन्यातील शेवटच्या बॉल पर्यंत खेळणारा बॅट्समन किंवा चौकार किंवा षटकार मारणारा मी एक बॅट्समन आहे असे मला वाटते".