शहर पोलिस दलातील पाच पोलिस निरीक्षकांसह 41 पोलिसांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला पोलिस दलातील उल्लेखनिय सेवेसाठी राज्याच्या गृह विभागाकडून "पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक' जाहीर करण्यात आले.त्यामध्ये शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पाच पोलिस निरीक्षकांसह 41 पोलिसांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले. तर दोन पोलिसांना 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षक पदक जाहीर झाले आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, मनिषा झेंडे, हेमंत पाटील, विजय कुंभार, संदीप भोसले, प्रकाश पासलकर यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले आहे. याबरोबरच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण शिर्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद माने, प्रवीण केंकरे, कैलास डाबेराव, रवींद्र राऊत, नंदकुमार मरकड, शेखर कोळी, सचिन नाझरे, प्रदीप सुर्वे, मोहन माळी, संजय कराळे, पोलिस हवालदार स्मिता अमोंडकर, दिगंबर सपकाळ, कुंदन शिंदे, संदिप काकडे, प्रशांत काकडे, योगराज घाडगे, प्रशांत बोऱ्हाडे, तुषार खडके,
सुदर्शना म्हांगरे, प्रमोद मगर, अजय थोरात, राहूल शितोळे, शैलेश सुर्वे, दयानंद कुंभार, राजस शेख, देवानंद सुर्यवंशी, पोलिस नाईक निलेश देसाई, संदिप राठोड, आकाश फासगे, अमोल पवार, जगदीश कस्तुरे, संग्राम शिनगारे, रणजित शिंदे यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करुन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे. याबरोबरच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वैभव गायकवाड व पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेले धनंजय कदम यांना 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षक पदक जाहीर झाले आहे.