प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी फजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज गुरुवार रोजी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत भेट घेतली. त्यावेळी फजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिवाजीराव गर्जे, माजी महापौर शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे-पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते म्हणून फजल शेख यांनी काम पाहिले आहे. यासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती पद देखील भुषविले आहे. त्यांचा पक्ष संघटनेतील अनुभव विचारात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर अजितदादा यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्ष संघटन मजबुतीसाठी आणि पक्षाची ध्येय-धोरणे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.