नामांकित कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री

पोलिसांनी व्यवसायिकावर गुन्हा  दाखल करुन तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवर अली शेख :

 पिंपरी चिंचवड : नामांकित कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची  विक्री करत असल्याची धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली . या बाबत पोलिसांनी व्यवसायिकावर गुन्हा  दाखल करुन तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पिंपरी कॅम्प  मधील साई चौकातील  जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स  व लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर  या दोन दुकानावर करण्यात आली.पोलिसांनी इस्माईल इस्तेखार खान  वय-26 रा. एसएनबीपी शाळेसमोर  मोरवाडी, पिंपरी , याच्या विरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग  (वय-36 रा. कसबा पेठ, मुळ रा. बिरोलीया, राजस्थान यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलजीएफ डिफेन्स कलनी कंपनीत तपासणी अधिकारी  म्हणून काम करतात. ते कॉपी राईट हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करतात. फिर्यादी यांना पिंपरी येथील साई चौकातील दोन दुकानामध्ये सुपरड्राय या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या कडे तक्रारीचा अर्ज करुन कारवाई करण्यात यावी अशी रितसर परवानगी मागितली होती.

 या बाबत पोलीस उपायुक्तांनी कारवाई करण्यास मंजूरी दिल्यानंतर रविवारी पिंपरी पोलीस ठाण्यातील पथकाने आणि फिर्यादी यांनी पंचा समक्ष दोन्ही दुकानात छापा टाकला. त्या वेळी जीन्स पाईंट बाय लेजेंड्स चॉईस या दुकानातून 15 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 312 बनावट जिन्स पँट जप्त करण्यात आल्या .त्या नंतर लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या दुकानातून दहा लाख रुपये किमतीच्या 200 जिन्स पँट जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.


प्रेस मीडिया लाईव्ह 

अनवर अली शेख : सह संपादक 


Post a Comment

Previous Post Next Post