प्रेस मीडिया लाईव्ह
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
देहूरोड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख यांनी काल आपल्या सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना सोपविला आहे.राज ठाकरे यांच्या मशिदी वरील आजांन चे लाऊडस्पिकरच्या भूमिकेमुळे मनसेला धक्का मागून धक्के बसू लागले आहेत.
दरम्यान मलिक शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत म्हणाले मी मागील १२ वर्षापासून मनसे च्या विविध पदावर काम केले पक्ष वाढी साठी नेहमी प्रयत्न करीत मलिक मनसे देहूरोड अशी ओळख निर्माण केली होती.परंतु गुढी पाडव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला त्यावेळेस विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, त्यावेळेस सुद्धा मी पक्षा सोबतच होतो, त्यानंतर ठाणे च्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली,आणि माझ्या समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे मी सदैव समाजासोबत राहणार अशी टोकाची भूमिका घेत मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे असे मलिक शेख यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.