- माजी महापौर माई ढोरे यांच्याहस्ते ध्वजारोहण पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली जगभरातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शुभेच्छा देते. तसेच, भाजपासारख्या पक्षाची कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान वाटतो, अशा भावना माजी महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.
भाजपा स्थापना दिनी (दि.६ एप्रिल) शहरात ‘अभिमान अभियान’सुरू करण्यात आले. यानिमित्ताने मुख्य जनसंपर्क कायारलय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरचिटणीस राजू दुर्गे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरचिटणीस राजू दुर्गे म्हणाले की, देशात लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत. भाजपाची वाटचाल यशस्वी असून, आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीवर विश्वास ठेवून सर्वसामान्य नागरिक पक्षाला साथ देत आहेत.भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दि. ६ ते १० एप्रिल या कालावधीमध्ये ‘अभिमान अभियान’ राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व शक्ती केंद्रांवर मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा होत आहे, असेही राजू दुर्गे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण…
भाजपा स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासीयांना संबंधित केले. त्याचे लाईव्ह प्रक्षेपण शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले. मंडल स्तरावरही स्क्रिन लावण्यात आल्या. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या नामफलकांचे वाटप करण्यात आले. शक्ती केंद्र, बूथ प्रमुखांनाही कार्यक्रमात जबाबदारी देण्यात आली.