मलिक शेख यांचे आपल्या मित्र व सहकार्‍यांसोबत कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

 मलिक शेख यांनी मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना देहूरोड शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता


प्रेस मीडिया लाईव्ह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :पठाण एम एस

देहूरोड  दि. 22 एप्रिल 2022

 रोजी काँग्रेस भवन,पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार मा. संजयजी चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील  मलिक शेख व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मलिक हसन शेख,असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी मा.आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.

 या सर्वांचे स्वागत करत असताना पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत. या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण तो कधीही संपला नाही कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे. तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचादेखील अभ्यास करावा असे जगताप म्हणाले.

यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जी सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष मा.हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव निखिलजी कवीश्वर, खजिनदार महेश बापु ढमढेरे, दीपक साचसर वेंकटेश कोळी,देहूरोड मुस्लिम समाजातील विचारवंत गफूरभाई शेख, राणी पाडियन,वैशाली जगताप, संभाजी पिंजण, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे व इतर मान्यवर उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post