चित्र वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितलं.

 या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कारवाईचे आदेश दिले .


प्रेस मीडिया लाईव्ह :

नवी दिल्ली – शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचं तरुणीने म्हटलं आहे.

आता या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

तरुणीने केलेल्या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून चित्रा वाघ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे आदेशही चाकणकर यांनी दिले आहेत. चाकणकर यांनी म्हटलं की, “काही लोक स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने दिवसभर टाहो फोडतात. पण स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी एका मुलीचे आयुष्य बरबाद करण्यात आलं आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक असल्याचा टोला चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

दरम्यान पीडित मुलीला भेटून यामध्ये काय धागेदोरे आहेत..? हे नक्की काय प्रकरण आहे..? याची संपूर्ण माहिती घेऊन जर कोणी आशा पद्धतीने एका व्यक्तीला बदनाम करत असेल किंवा एखाद्या तरूणीचे आयुष्य बरबाद करत असेल तर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील असं चाकणकर यांनी म्हंटल आहे.

चित्र वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितलं. माझ्या मोबाईलमधून एका ऍपच्या मदतीने मेसेज पाठविण्यात आले. शिवाय चित्रा वाघ यांनीच आपल्याला गोव्यात डांबून ठेवले होते, असा गंभीर आरोपही तरुणीने केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post