राज ठाकरेंच्या मध्ये मी कधीही सातत्य पाहिलं नाही.... शरद पवार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

राज ठाकरेंच्या मध्ये मी कधीही सातत्य पाहिलं नाही. याच्यापुढे पाहायला मिळेल की नाही हे ही माहित नाही. त्यामुळे त्याची भूमिका मी कधीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी केंद्र सरकार वरती टीका केल्याचं सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं आहे.त्यामुळं प्रत्येकवेळी ते आपली भूमिका बदलत असतात. काल त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तेत असलेल्या नेत्यांवरती टीका केल्याने राज ठाकरेंच्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घ्यायला सुरूवात केली आहे.

दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात....जितेंद्र आव्हाड.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला हा इतिहास आहे महाराष्ट्राचा अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर केली.

राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहिती नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची पुस्तके वाचायला हवी होती. त्यांना जात पात काय असते हे समजले असते आणि जात-पातचे जन्मदाते कोण आहेत हेही समजले असते. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरीपुरवठा मंत्री आहेत. तटकरे लोकसभेत खासदार आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणे हे शरद पवारांचे आवडते काम आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं

Post a Comment

Previous Post Next Post