किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार ...खासदार संजय राऊत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. लवकरच किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून मिरा भाईंदर महानगरपालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे.यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका आणि राज्यात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सर्व कागदपत्रं सुपूर्द केली आहेत  युवा प्रतिष्ठान एनजीओद्वारे शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रभक्ती उफाळून आली आहे. त्यांनी पवारांवर ट्विट केले आहेत. फडणवीसांनी एखादं ट्विट टॉयलेट घोटाळ्यावर करावं. तुम्ही आमच्यावर कितीही फुसके आरोप केले तरी आम्ही मागे हटणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे द्या. सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला आहे. तुम्ही पुरावे काय मागताय ? राजभवनानं सांगितलं की पैसे जमा झाले नाहीत. लोकांची दिशाभूल करू नका. विक्रांतसारखा टॉयलेट घोटाळा देखील महाराष्ट्रात दुर्गंधी निर्माम करणार आहे. किरीट सोमय्या आज ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, 

Post a Comment

Previous Post Next Post