एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचा काल हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने साईल यांचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दरम्यान आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर असल्याचा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही केली होती. किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post