राज ठाकरेंनी चार दिवसात माफी मागावी अन्यथा राज्यभर फौजदारी खटले दाखल करु..आझाद समाज पार्टी.

राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे पुरावे सादर करा अन्यथा माफी मागा  आझाद समाज पार्टी

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई: मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी  गुडीपाडव्याच्या दिवशी केलेले भाषण वादळी आणि तितकचं वादग्रस्त ठरलं आहे. कारण त्यांच्यी मशिदीवरील भोंग्या विरोधातील भूमिकेने मुस्लीम समाज नाराज आहे.त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवरती केलेली टीकेमुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. आता चंद्रशेखर आझाद रावण यांच्या आझाद समाज पार्टी नं राज ठाकरेंना  पत्र लिहिले आहे. राज ठाकरेंनी भाषणात केलेल्या वक्तव्यांबद्दल येत्या चार दिवसात माफी मागावी अन्यथा राज्यभर फौजदारी खटले दाखल करु अश्या आशयाचं पत्र आझाद समाज पार्टीच्या वतीने राज ठाकरेंना पाठवण्यात आले आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे पुरावे सादर करा अन्यथा माफी मागा अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

राज ठाकरे जाणिवपुर्वक दंगली भडकवण्याचे काम करत आहेत. त्यांनी केलेल्या एक तासाच्या भाषणात तुम्ही बहुजन समाजाच्या ऐक्याची हत्या करण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी  आपल्या स्वखर्चातून मंदीरं, मशिदी, मदसरे, बौद्ध विहार, समाज मंदीरं उभारली त्याचा आधार घेऊन आपण बहुजन समाजाला भडकवण्याचे काम करत आहात. त्याने कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचते अशा आशयाचे लेखन पत्रामध्ये केले आहे. पुढे पत्रात पोलिसांच्या दृष्टीने काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. चार दिवसात माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात फौजदारी गुन्हे दाखल करु असा इशारा आझाद समाज पार्टीच्यावतीने देण्यात आला आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मदरशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर मुंबईमध्ये जिथे कुठे मशिदीमध्ये भोंगे वाजतील त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा असा आदेशच राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून दिला होता. तो आदेशही पाळण्यात आला आणि अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांना अटकही झाली. या सर्वांमध्ये सुजात आंबेडकर यांचं वक्तव्यही चर्चेचा विषय ठरला. मला राज ठाकरेंचे वक्तव्य मान्य परंतु राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असे आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिले होते.

Post a Comment

Previous Post Next Post