अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही . गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. 


दरम्यान, यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिलीप वळसे पाटील म्हणाले की,'प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळायला हव्या. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे अजान होत असते त्याचवेळी लावू नये.’ तसेच अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.

दरम्यान, 'अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.' तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे दोन एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post