प्रेस मीडिया लाईव्ह :
आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्री भोईवाडा परळमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 131 किलोचा केक कापून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.