रमजान महिना : सहेरी इप्तारीची वेळ



रमजान महिन्याला 3 एप्रिलपासून सुरुवात होतेय. रमजानचा महिना अतिशय पवित्र मानला जातो. या पूर्ण महिन्यात मुस्लिम धर्मीय निरंकार उपवास म्हणजेच 'रोजा' ठेवतात.
यावेळी दिवसभर पाणी देखील पिलं जातं नाही. पहाटे थोडसं खाऊन रोजाची सुरुवात केली जाते,याला 'सहेरी' म्हणतात. सहेरीची वेळ पहाटेची असते. संध्याकाळी रोजा सोडला जातो. त्याला 'ईफ्तार' म्हणतात. ईफ्तारच्या वेळी खजूर खाल्ले जातात. त्यानंतर जेवू शकतात.

रमजान मध्ये नमाज पठण, कुरआन पठण आणि प्रवचन ऐकण्याला महत्व असतं. त्याचबरोबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो, याला 'जकात' (Zakat) म्हंटलं जातं. एकूण उत्पन्नाच्या 2.5 % रक्कम दान केली जाते. त्यामुळे गोर- गरिबांना मोठ्या प्रमाणात दान करणं कर्तव्य मानलं गेलंय. 

महिनाभरात अनेक ठिकाणी संध्याकाळी इफ्तारच्या वेळी फूडस्टॉलही लागतात. याठिकाणी खवय्यांची गर्दी असते. मुंबईमध्ये मोहम्मद अली रोड वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते.पुण्यात मोनीमपुरा, कौसरबाग या परिसरात रमजानमध्ये फूडस्टॉलवर पदार्थांचा दरवळ असतो.रोजाचे वेळापत्रक असते, त्याप्रमाणे मुस्लिमधर्मीय रोजा ठेवतात. मुस्लीमधर्मियांचं कॅलेंडर चंद्राच्या तारखेनुसार असतं. 30 दिवस रोजे झाल्यानंतर 'ईद' साजरी केली जाते. यादिवशी सकाळी ईदची नमाज ( ईद-उल्- फित्र) पठण केली जाते. यावर्षी २ मे रोजी रमजान ईद साजरी केली जाईल. यादिवशी शिरखुर्मा बनवला जातो. 

Post a Comment

Previous Post Next Post