प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कुस्तीमधील प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा काल साताऱ्यात पार पडली. कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत मुंबईचा विशाल बनकर आणि कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यात पार पडली असून या अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजने मानाची गदा आपल्या खांद्यावर घेतली आहे.त्यानंतर आयोजकांकडून कोणतीही रोख रक्कम मिळाली नसल्याचा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर टाकला होता. त्यानंतर सातारा - जावळीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा - जावळीकरांच्या वतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे
दरम्यान कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकांसाठी सध्या राजकीय पक्षांची घोडदौड सुरु आहे. यादरम्यान भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूरात प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी माध्यमांना बोलताना महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकलेल्या पृथ्वीराजला भाजपाकडून ५ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.पृथ्वीराजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता पृथ्वीराज पाटील यांना आयोजकांकडून कोणत्याही प्रकारचं रोख बक्षीस देण्यात आलं नाही त्यावर विजेत्या पृथ्वीराजने नाराजी व्यक्त केली आहे. काल झालेल्या या अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजने ५-४ या फरकाने हा सामना जिंकला आहे. तो अवघ्या २० वर्ष वयाचा असून महाराष्ट्र केसरीसारख्या मनाच्या स्पर्धेची गदा मिळवणारा तो एकमेव पहिलवान ठरला आहे.त्याच्या पुढील सरावासाठी भाजपाकडून हे बक्षीस देण्यात येत असल्याचं त्यांनी माध्यमांना बोलताना दिली. तसेच ते मंदिरावरील भोंग्याच्या प्रकरणासहीत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे.
या संदर्भात बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली.पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाण गावचा रहिवाशी असून तो अवघा वीस वर्षाचा पैलवान आहे. सध्या तो भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत आहे. त्याचे संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण झालं असून मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा त्याने केला. तसेच कुस्ती खेळण्यासाठी त्याला महान भारत केसरी वस्ताद दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि वस्ताद धनाजी पाटील यांच्याकडून धडे मिळाले आहेत.
संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले.