प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर: मुरलीधर कांबळे
चित्रा वाघ यांची कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुक्तसैनिक वसाहत येथे रात्री सभा पार पडली. भाजपा उत्तर कोल्हापूरचे उमेदवार सत्यजित कदम प्रचारार्थ सभेत ही सभा सुरु होती. दरम्यान सभा असताना एका बाजूने व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ आपल्या आरोपात म्हणाल्या, 'वाह रे बहाद्दरांनो. समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजित कदम प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली. तुमची दहशत गुंड बलात्कार्यांवर दाखवा.असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा.'
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली आहे, याबद्दल पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र यांच्या आरोपांमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.