ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने चिथावून देणे या 153-ए या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हा दाखल केलेल्या अहवालाची प्रत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप मधुकर पाटील (वय 56, रा. मुक्तसैनिक वसाहत, कोल्हापूर) यांनी दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करून सदावर्ते यांना अटक करण्याची लेखी मागणी केली होती. या अर्जावर ज्येष्ठ विधी अधिकाऱयांचा अभिप्राय घेऊन आज गुन्हा दाखल करण्यात आला. सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. आता या गुह्यातही सदावर्ते यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून देण्यात आले.