मशिदीवरील भोंगे प्रकरणी मुस्लिम बांधवांनी मानले केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार



प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर दि.17 - मशिदीवरील भोंगे काढण्याचा  राज ठाकरे यांनी ईशारा दिल्यानंतर मुस्लिम समाजाच्या पाठिशी खांबीर उभे राहत मशिदीवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी प्रसंगी रिपब्लिकन पक्ष शक्तीप्रदर्शन घडवेल अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रात धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी सतत पुढे असणारे  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे कोल्हापूर येथील मुस्लिम बांधवांनी भेट घेऊन मुस्लिम समाजातर्फे ना रामदास आठवले यांचे आभार मानले. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद; महासचिव सुफियान युसूफ पठाण सह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच रिपाइं चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे; कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे ; मंगलराव माळगे; दीपक भोसले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादाचे मुद्दे कोणीही काढु  नये; धार्मिक सलोखा सामंजस्य आणि शांतता पाळून हिंदू मुस्लिमांनी सर्व धर्मीयांनी समाजात ऐक्य बंधुभाव निर्माण करा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

या वेळी 

आरपीआय आहे हिंदू मुस्लिमांसंगे ; 

पण लाऊडस्पीकर मुळे आम्ही होऊ देणार नाही दंगे;

बळजबरीने आम्ही काढू देणार नाही मशिदीवरील भोंगे 

वादाचे मुद्दे बाजुला सारून बंधुतेने राहा सर्वांनी एकमेकासंगे! 


अशी शीघ्र कविता नारामदास आठवले यांनी सादर केली.



               

Post a Comment

Previous Post Next Post