प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : “राज्यात कोणतही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. मात्र या शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती राज्यात आहेत.त्यांच्या मुळे महाराष्ट्राच्या शांततेला बाधा पोहचत आहे,” असे वक्तव्य राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. कोल्हापूरमध्ये चाकणकर या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण केले जात असून, विरोधकांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा देण्याऱ्या नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याच्या आक्रमक भूमिकेवर त्या बोलत होत्या.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, राज्यात कोणतही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. ज्यांना काम करायचं नाही आणि इतरांना ही करू द्यायचे नाही, त्यांच्याकडून असले प्रकार सुरु आहेत. प्रत्येक पक्षाचे संस्कार असतात. आणि ते त्त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतात, असा टोला ही चाकणकर यांनी भाजपला लगावला.
मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यातच राणा दाम्पत्य हे हनुमान चाळीसासाठी आग्रही होते. परंतु आता राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे.
: