जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह
दिनेश महाडिक प्रतिनिधी
खोपोली कडून पनवेल कडे जुना मुंबई पुणे हायवे रोड जात असताना स्कूटी चालवणाऱ्या महिलेला चक्कर आल्याने आई व मुलगी खाली पडले , त्यात त्यांचा हात फॅक्चर झाला तर दहा टक्के डोक्याला पडले आहेत ग्रामीण रुग्णालय चौक येथे आई व मुलगी यांना दाखल करण्यात आले आहे
आमचे खालापूर तालुका प्रतिनिधी दिनेश महाडिक यांनी व त्यांच्या सहकारी मित्र शिवसेनेचे कार्यकर्ते महाडिक यांच्या गाडीतून या दोन्ही महिलांना घेऊन चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
संस्कृती संतोष सातपुते राहणार भोर जिल्हा पुणे आणि तिची आई राणीताई संतोष सातपुते या भोर पुणे येथून पनवेल येथे जात होत्या मुंबई पुणे जुना हायवे येथे येथे असलेल्या वावंढळ गावा जवळ गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन नाल्यामध्ये पडली व दोघी मायलेकी यांना डोक्याला व हाताला पायाला खूप मार लागला आहे लगेच वावंढळगावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख अमोल जय राम कदम व विनेगाव चेशाखा प्रमुख व प्रेस मीडियाचे खालापूर तालुका प्रतिनिधी दिनेश रमेश महाडिक हे ताबडतोब जेथे अपघात झाला त्याजागी जाऊन त्या दोघी मायलेकी ना ताबडतोब दिनेश महाडिक यांच्या गाडीमध्ये घेऊन चौक येथे साई हॉस्पिटल मध्ये दाखल केले व त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे कळविण्यात आले