पावसाने अचानकर हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
प्रेस मीडिया लाईव्ह
अचानक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या या दिवसात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून पासून काही वेळेसाठी दिलासा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात कडक उन्हामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.सांगली शहर व परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज सकाळपासूनच सांगली शहरासह ग्रामीण परिसरात उष्णता जाणवत होती. त्यानंतर दुपार ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारच्या सुमारास वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
उष्णतेमुळे नागरिक त्रस्त...
सध्या सांगली जिल्ह्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागातही उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. उष्णतेमुळे कंटाळलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या द्राक्ष बागेतील कामंही आटपत आली असून ऊस तोडही संपत आली आहे. त्यामुळे या पावसाचा शेतीवर गंभीर परिणाम होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.