इचलकरंजीत लक्ष्मी देवीची यात्रा धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी : महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी : 

इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका  लक्ष्मी दड्ड येथे लक्ष्मी देवीची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.याञेनिमित्त लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच विविध धार्मिक कार्यक्रम ,स्पर्धा व महाप्रसाद कार्यक्रमाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला‌‌ .


इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका लक्ष्मी दड्ड येथे असलेले लक्ष्मी देवीचे मंदिर हे अत्यंत जागृत व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे असल्याची भाविकांची अतूट श्रद्धा आहे.काही दिवसांपूर्वी या मंदिराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे.तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी बाकडी बसवण्यात आली आहेत.यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांच्यासह अनेकांचे विविध स्वरुपात सहकार्य मिळाले आहे.नुकताच या मंदिरातील लक्ष्मी देवीची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.यानिमित्त सकाळी लक्ष्मी देवीची विधिवत पुजाअर्चा ,आरती ,पालखी मिरवणूक व दुपारी महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम पार पडले.याञेनिमित्त लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांच्या पुढाकाराने घोडा - बैल गाडी शर्यत ,एक्का बैल गाडी शर्यत व धनगरी ओवी स्पर्धा घेण्यात आल्या.यातील विजेत्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी चेतन पोळ , संदीप जामदार ,पिंटू कोळी ,लाल्या बंडगर ,आनंदा कचरे , विनायक आरेकर , अजित गोलंगडे , ओंकार पुजारी , संभाजी कम्मे , विनोद कदम ,संजय पाटील ,राजू कुंभार , शिवाजी बंडगर ,दत्ता शेळके ,किरण पाटील , काशिनाथ गोलंगडे ,पिंटू कोळी ,वसंत बंडगर , अतुल काकडे ,मंथन हणबर , समीर आरकटे ,सौरभ माने ,आप्पा आंबी ,प्रवीण डावरे ,गोटू कम्मे ,शुभम हणबर , नामदेव तंडे ,संजय कुंभार ,तेजस पोळ यांच्यासह श्री लक्ष्मी मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ,युवा ग्रुप मिञ परिवारचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post