प्रेस मीडिया लाईव्ह :
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कोल्हापूर उपजिल्हा संघटकपदी इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते सुशिल बनसोडे यांची निवड करण्यात आली.ही निवड मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली.सदर निवडीचे पञ त्यांना मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे ,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन जाधव ,मनसे तारदाळ - खोतवाडी अध्यक्ष बाळासाहेब राजमाने , सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
इचलकरंजी शहर परिसरात सुशिल बनसोडे हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात.याशिवाय समाजातील पिडीत ,अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.विशेष म्हणजे युवकांचे मोठे संघटन करुन त्या संघटीत ताकदीचा विधायक कार्यासाठी वापर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.या भरीव सामाजिक कार्याची दखल घेवूनच सुशिल बनसोडे यांची
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कोल्हापूर उपजिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली.ही निवड मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली.
यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर , जयराज लांडगे व गजानन जाधव यांनी राजसाहेब ठाकरे यांचा विचार सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहचवून मनसे पक्ष अधिक बळकट करतानाच सर्वांना न्याय मिळवून द्यावा ,असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.
यावेळी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे कोल्हापूर उपजिल्हा संघटक सुशिल बनसोडे यांनी मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्व सहका-यांच्या मदतीने कलाकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली.या निवडीसाठी त्यांना
मनसे जिल्हा नेते पुंडलिक जाधव, मनसे हातकणंगले तालुकाध्यक्ष दौलत पाटील, मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रताप पाटील, उप जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर, मनोहर जोशी, मोहन मालवणकर,शहाजी भोसले ,राजेंद्र निकम यांचे सहकार्य लाभले.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.