लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे मोठे कौतुक..
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानच्या गो शाळेत पंधरा दिवसानंतर आणखी एका गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातून खिळे, वायर, आणि 45 किलो वजनाचे प्लास्टिक काढण्यात आले. तीन तास ही शस्त्रक्रिया चालू होती.गो सेवा प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे सर्वञ मोठे कौतुक होत आहे.
इचलकरंजी येथे तीन आठवड्यांपूर्वी श्री लक्ष्मी नारायण गो सेवा शाळेत एका भटक्या गाईला तिच्या बछड्यासह दाखल केले होते.इचलकरंजी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुगकर यांनी दिलेल्या माहितीवरून जवाहरनगर परिसरातून ती गाय आणली व गो शाळेत दाखल केली होती.गाईची अवस्था पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर शस्ञक्रिया
करण्याचा निर्णय दिला होता. यानंतर भटक्या व्यालेल्या या गाईची स्थिती अधिकच बिघडल्याने तातडीने तिच्यावर शस्ञक्रिया करुन तिची त्रासातून मुक्तता करण्यात आली.सदर शस्ञक्रियेनंतर गाईच्या पोटातून खिळे ,वायर आणि 45 किलो पेक्षा जादा प्लास्टिक काढण्यात आले. या वेळी भटक्या अथवा गो शाळेतील आणि घरगुती गाईना अन्न देताना कागद, प्लास्टिकमधून खाऊ घालणे टाळा असे आवाहन गो -सेवक शिव प्रसाद व्यास यांनी केले आहे.
या शस्ञक्रियेसाठी डॉ. सत्यदीप चिकबीरे, डॉ. राजू पुजारी, डॉ.भोसले त्यांचे सहकारी प्रशांत यादव आदींनी योगदान दिले. यावेळी शरद बाहेती, शिवप्रसाद व्यास, धीरज पारिक,सुनिल कांदेकर आदी हजर होते.दरम्यान ,श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे सर्वञ मोठे कौतुक होत आहे.