प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील नदीवेस नाका परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकासमार्ग दिंडोरी प्रणित केंद्राच्या वतीने रविवार ३ एप्रिल रोजी स्वमी समर्थ जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकासमार्ग दिंडोरी प्रणित केंद्राच्यावतीने विविध धार्मिक सेवा , प्रापंचिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.या केंद्राच्या वतीने रविवार ३ एप्रिल रोजी स्वामी समर्थ जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ८ वाजता भूपाळी आरती , सव्वा ८ वाजता श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन ,जप ११ माळी , होमहवन , सकाळी साडे १० वाजता नैवेद्य आरती व मार्गदर्शन , दुपारी १२ वाजता मांदियाळी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून पुण्यलाभ मिळवून घ्यावा ,असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक मार्ग दिंडोरी प्रणित केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.