प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील केएटीपी ग्राउंड येथे २९ एप्रिल ते २ मे या कालावधीतआयकॉन स्टिल प्रायोजित वास्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर , जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वास्तू कमिटीचे चेअरमन नितीन धूत यांनी दिली.
असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असोसिएशन या सर्व बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर संस्था आहेत.या संस्थांच्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी मानून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.सर्व स्तरातील नागरिकांना स्वप्नातलं घर साकारता यावं , यासाठी देखील या संस्थांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी येथे केएटीपी ग्राऊंडवर
असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल ते २ मे या कालावधीतआयकॉन स्टिल प्रायोजित वास्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार प्रकाश आवाडे , प्रांताधिकारी डॉ.विकास खरात , मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल ,अप्पर तहसीलदार शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून मागील २ वर्षात बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानात, साधनात झालेले बदल नागरिकांपर्यंत पोहचवू नक्कीच त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.त्यामुळे हे प्रदर्शन सर्वांसाठी जणू एक चांगली पर्वणीच ठरणार आहे.त्याचबरोबर सदर प्रदर्शनामध्ये गृह व बांधकाम प्रकल्प व नविन तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था व बँकांची माहिती, अर्थात वास्तू आणि वास्तूशी संबंधित सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनामध्ये ११५ हून अधिक स्टॉल असल्याचे वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत यांनी सांगितले.
यावेळी क्रेडाई इचलकरंजी अध्यक्ष मयूर शहा, दादासो भाटले, संजय रुग्गे, अनिल मनवाणी, संदीप जाधव, अक्षय सातपुते, महेश महाजन, विलास गोसावी, राजेंद्र खंडेराजुरी, राजुभाई नानावटी आदी मान्यवर उपस्थित होते.