प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
गोवा राज्यातील तळेगाव येथेआनंदोत्सव समारंभात रोटरी डिस्ट्रिक्टच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दलइचलकरंजी रोटरी क्लबला बेस्ट क्लबसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते तसेच विद्यमान गव्हर्नर गौरिष धौंड , आनंद कुलकर्णी ,सनतकुमार आरवाडे ,प्रतिमा धौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
इचलकरंजी रोटरी क्लबने कोविड महामारी ,महापुर यासह अन्य नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच इतर काळात सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत वेगळी ओळख निर्माण केली आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून गोवा राज्यातील तळेगाव येथेआनंदोत्सव समारंभात रोटरी डिस्ट्रिक्टच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल इचलकरंजी रोटरी क्लबला बेस्ट क्लबसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.यामध्ये इचलकरंजी रोटरी क्लबला रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते बेस्ट क्लब पुरस्काराने सन्मानित केले.तसेच या क्लबला बेस्ट इन व्होकेशनल सर्व्हिस , हायेस्टपर कॅपीटा ॲन्युअल गिव्हिंग , बेस्ट इन मेंबरशिप रिटेन्शन , बेस्ट इन कम्युनिटी सर्व्हिस ,पाॅल हॅरिस एपीएफ चॅलेंज , अभय यळरुटे यांना बेस्ट प्रेसिडेंट ,दिपक निंगुडगेकर यांना बेस्ट सेक्रेटरी ,मनिष मुनोत व भाऊ नाईक यांनाडिस्ट्रिक्ट सर्व्हिस आणि बेस्ट रोटरी ॲन्स अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्टचे विद्यमान गव्हर्नर गौरिष धौंड , आनंद कुलकर्णी ,सनतकुमार आरवाडे , महेंद्र मुथा ,प्रतिमा धौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.सदरचे पुरस्कार स्विकारताना इचलकरंजी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ , सेक्रेटरी संजय घायतिडक ,प्रकाश गौड , सत्यनारायण धूत , सर्जेराव शिंदे ,शरद देसाई ,सुशिल माहेश्वरी ,आनंदा माधव, राजू जाधव , अनिल भुतडा ,पंकज कोठारी , महादेव खारगे ,गिरिष बदानी ,वसंत पाटील यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.