राष्ट्रीय काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाची पालिकेकडे मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळांमध्ये पटसंख्या चांगली असली तरी इमारतींची दुरवस्था झाली असून भौतिक सुविधांची वानवा आहे. नगरपालिकेने तीन पडझड झालेल्या इमारतींची दुरुस्ती करून त्याठिकाणी आवश्यक त्या भौतिक सुविधा द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने नगरपालिकेचे प्रशासक डॉ. प्रदिप ठेंगल यांना सादर करण्यात आले.
इचलकरंजी नगरपालिकेच्या सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान उर्दु शाळा क्र. 46 मध्ये 203, फकरुद्दीन अलीअहमद न. प. उर्दू शाळा क्र. 52 मध्ये 354 आणि डॉ. झाकीर हुसेन न. प. उर्दू शाळा क्र. 19 मध्ये 74 असे 631 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळा इमारतींची पडझड झाली असून फरशा, खिडक्या नादुरुस्त झाल्या आहेत. शौचालया अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने इमारतींची आवश्यक ती दुरूस्ती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी करुन भौतिक सुविधा देणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस समीर जमादार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व प्रशासक डॉ. प्रदिप ठेंगल यांच्यात चर्चा झाली आणि त्वरीत भौतिक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात ताजुद्दिन खतीब, नासीर गवंडी, पोपट यादव, संजय पोळ, वेदिका कळंत्रे, शबनम जमादार, अजित रजपूत, मखतुम जमादार, हिदायतुल्ला नालबंद यांचा समावेश होता.